- ☞जी भाषा फक्त बोलण्यापुरती उपयोगात आणली जाते, त्या भाषेला बोली भाषा म्हणतात.
- ☞बोलीभाषेला व्याकरण नसते.
- ☞मराठीच्या ५२ बोली आहेत. ★★★
| मराठीची बोली | प्रदेश | वैशिष्ट्ये |
|---|---|---|
| १) झाडी बोली | गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली | १) हिंदी भाषेचा प्रभाव२) ‘ळ’ च्या जागी ‘र’ चा वापर३) ‘ण’ चा वापरच करत नाहीत. |
| २) वारली | ठाणे, पालघर | १) ‘ह’ चा वापर जास्त२) ‘ळ’च्या जागी ‘ल’ चा वापर३) ‘ण’च्या जागी ‘न’ चा वापर |
| ३) मालवणी (कुडाळी) |
सिंधुदुर्ग, रत्नागिरी (कुडाळ) मालवण |
१) अनुनासिकांचे प्रमाण जास्त२) ‘ब’ च्या जागी ‘भ’ चा वापर३) ‘ण’ च्या जागी ‘न’ चा वापर |
| ४) अहिरानी (खानदेशी) | नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार (खानदेश) | १) हिंदी आणि गुजरातीचा प्रभाव२) ‘ह, ळ’ च्या जागी ‘य’ चा वापर३) ‘त’ च्या जागी ‘म’ चा वापर४) कवयित्री ‘बहिणाबाई चौधरी’ यांच्यामुळे महाराष्ट्राला परिचित |
| ५) चंदगडी भाषा | कोल्हापूर (ता.चंदगड) | १) विभक्तीच्या ‘स’ या प्रत्ययाचा अधिक वापर |
| ६) वऱ्हाडी भाषा | (विदर्भ) बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, वाशिम | १) महानुभाव पंथाच्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथामध्ये वापर (लीळा-आठवणी) |
| ७) हळबी | चंद्रपूर, भंडारा | १) ‘अ’ च्या जागी ‘आ’ चा वापर२) ‘व’ च्या जागी ‘ल’ चा वापर |
| ८) बंजारा | विदर्भ, मराठवाडा | १) हिंदी, गुजरातीचा प्रभाव |
